CJI Ranjan Gogoi recommends Justice S A Bobde as his successor
CJI Ranjan Gogoi recommends Justice S A Bobde as his successor 
बातम्या

सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा आज शपथविधी,

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा आज शपथविधी होणार आहे... विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी सेवानिवृत्त झाल्याने  त्यांच्या जागी शरद बोबडे यांची नियुक्ती झाली.. मूळचे नागपूरचे असलेल्या बोबडे यांनी अयोध्या निकालप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावलीय.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदासाठी महाराष्ट्रातील आणि मराठी असलेल्या न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस. ए. बोबडे) यांच्या नावाची शिफारस केली आहे.

सरन्यायाधीश गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. रंजन गोगोई यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.

बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात झाला. बोबडे हे 1978 मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये दाखल झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून प्रॅक्टिस केली. काही वर्षांच्या प्रक्टिसनंतर 1998 मध्ये ते वरिष्ठ वकील झाले. त्यानंतर मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्तीपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला

Web Title - CJI Ranjan Gogoi recommends Justice S A Bobde as his successor

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT